” बिघडत चाललेल्या ” समाजाला विचार करायला लावणारे निबंध
‘ अगेन्स्ट एवरीथिंग ‘ हा मार्क ग्रीफ यांचा ताजा निबंध संग्रह. संग्रहात मार्क ग्रीफ अमेरिकेच्या सामाजिक-राजकीय-आर्थिक परिस्थितीचं विश्लेषण करतात. अमेरिकेतली माणसं खातात म्हणजे काय करतात, अमेरिकेतली माणसं संगित ऐकतात किंवा व्यायाम करतात म्हणजे काय करतात, अमेरिकेतल्या लोकांचं टीव्ही वाहिन्या पहाणं म्हणजे नेमकं काय असतं याचा विचार लेखक या पुस्तकात करतात. पुस्तकातले सर्वच्या सर्व संदर्भ अमेरिकेतले असल्यानं बिगर अमेरिकन वाचकाला संदर्भ विसरून पुस्तक वाचावं लागतं. तरीही अमेरिका समजायला पुस्तकाची मदत होते. अमेरिकेत जे घडतं ते कालांतरानं जगात, भारतात घडत असतं. त्यामुळं…