युस्कारा या भाषेची जगण्याची धडपड
भाषेची जगण्याची धडपड. स्पेनमधे अनेक भाषा बोलल्या जातात. मुख्य भाषा स्पॅनिश. स्पॅनिशचीही अनेक रुपं बोलली जातात. युस्कारा ही भाषा स्पेनमधे आज सुमारे ७ लाख माणसं, म्हणजे स्पेनच्या लोकसंख्येच्या दोन टक्क्यापेक्षा कमी माणसं, बोलतात. नेमका आकडा कळायला मार्ग नाही. बास्क आणि नवारा विभागातच ही भाषा बोलली जाते. ही भाषा स्पॅनिशपेक्षा इतकी वेगळी आहे की स्पॅनिश लोकांना त्यातलं हो की ठो कळत नाही. ही भाषा दडपण्याचा प्रयत्न कित्येक शतकं होतोय. गुप्तरीत्या घराच्या अंधाऱ्या माजघरांत ही भाषा आजांनी नातवांकडं सरकवली. स्पेनमधे बाहेरची माणसं…