दशक्रिया. अधिक चांगला चित्रपट होऊ शकला असता.
दशक्रिया हा एक चांगला चित्रपट होऊ शकला असता. चित्रपटात क्रियाकर्म करणाऱ्या दोन ब्राह्मणांमधली स्पर्धा असं एक कथानक आहे. क्रियाकर्म करणारे ब्राह्मण मृतांच्या नातेवाईकांकडून पैसे उकळतात असं आणखी एक कथानक आहे. कर्मकांडं, कर्मकांडांचा फोलपणा, अन्याय,त्याचं धर्माशी असलेलं नातं हे तिसरं कथानक. भान्या नामक एक खटाटोपी मुलगा हे चौथं कथानक. नाना धंदे करून हा मुलगा पैसे कमवतो, तो वात्रट असतो, तो त्याच्या वागण्यानं वरील चारही तीन्ही उपकथानकांमधल्या दोषांवर बोट ठेवतो. दिग्दर्शकाला चार अत्यंत नाट्यमय घटक एकत्र आणून त्यातून एक सलग जैविक कथानक…