आशय आणि अभिव्यक्ती अशा दोन्ही गोष्टी साधणारा चित्रपट, पोस्ट.
वॉशिंग्टन पोस्ट, प्रकाशक कॅथरीन ग्रॅहॅम, संपादक बेन ब्रॅडले. पेंटॅगॉन पेपर्स, वॉशिंग्टन पोस्ट, पत्रकारीचा इतिहास. वियेतनाममधे अमेरिकनं शस्त्रं, सैनिक, खूप निःशस्त्र आणि निरपराध माणसं मारली. वियेतनामीनी चिकाटीनं अमेरिकन संकटाला तोंड दिलं, अमेरिका पराभूत झाली. हे ढळढळीत सत्य अमेरिकन सरकार अमेरिकन जनतेपासून लपवत होतं. वॉशिंग्टन पोस्टचे व्यवस्थापकीय संपादक बेन ब्रॅडलेनी रँड कॉर्पोरेशनकडं गोळा झालेली माहिती मिळवली, माहितीवर आधारीत लेखमाला पेंटॅगॉन पेपर्स या शीर्षकानं सुरु केली. पोस्टवर दबाव आला. सरकारनं बंदी घातली. पोस्टची लायसेन्सेस रद्द केली, पोस्ट हा देशद्रोह करत आहे असं म्हणत…