१९०९ सालचा दिवाळी अंक, मनोरंजन.
१९०९ साली प्रसिद्ध झालेल्या मनोरंजन या मासिकाच्या दिवाळी अंकाच्या काही प्रती सध्या पार्ल्यातल्या मॅजेस्टिक बुक डेपोत मिळत आहेत. काशीनाथ रघुनाथ मित्र हे मनोरंजनचे संपादक प्रकाशक. संपादक म्हणतात की मनोरंजनची ही१५ वी दिवाळी आहे. १९२ पानांचा मजकूर आणि २७ पानांची जाहिरात आहे. अनेक मोठ्या लेखकांचे लेख यायचे राहिले, अनेकांचे लेख आले पण कंपोज व्हायचे राहिले, अनेकांचे लेख कंपोज झाले पण छपाईच्या वेळापत्रकात न बसल्यानं प्रसिद्ध करता आले नाहीत असं संपादकांनी लिहिलंय. निर्णय सागर, कर्नाटक प्रेस आणि बाँबे वैभव प्रेस या…