वियेतनाम,बिनलादेन,सीरिया बाँबिंग- सरकारचा खोटेपणा नागडा करणारे पत्रकार सेमुर हर्श
शोध पत्रकारीची पन्नास वर्षं. वियेतनाममधे अमेरिकन सैनिकांनी केलेलं निरपराध माणसांचं हत्याकांड जगासमोर उघड करण्याच्या घटनेला पन्नास वर्षं झाली. १४ मार्च १९६८ या दिवशी वियेतनाममधील मी लाय या गावात अमेरिकन सैनिकांनी साडेतीनशे ते पाचशे निरपराध स्त्रिया आणि मुलांना गोळ्या घालून मारलं. विनाकारण. प्रेतांच्या ढिगाखाली लपलेलं एक छोटं मूल प्रेतं दूर सारून बाहेर पडलं. त्यालाही जिवंत ठेवायचं नाही असं ठरवून सैनिकांनी गोळ्या घातल्या. एका निःशस्त्र स्त्रीला सैनिकानं लाथाबुक्क्यांनी बडवलं, ती खाली पडली असताना, तिला गोळ्या घातल्या. हेलिकॉप्टरमधून जमिनीवरच्या सैनिकांना हवाई संरक्षण देणाऱ्या…