ऑक्टोबर. कथा, कविता आणि डॉक्युमेंटरी.
‘ ऑक्टोबर ‘ हा प्राजक्ताची फुलं जपणाऱ्या एका मुलीचा, तिच्या आईचा आणि तिच्या एका मित्राचा सिनेमा आहे. शिवली ही पंचतारांकित हॉटेलमधे हॉटेल व्यवसाय शिकणारी उमेदवार मुलगी आहे. तिची आई आयआयटीत प्रोफेसर आहे. शिवली हुशार आहे, बुद्धीमान आहे, कामं नीटनेटकेपणानं करणारी मुलगी आहे. हॉटेलात त्यांचा एक तरुण गट आहे. दिल्ली या धकाधकीच्या शहरात ती मुलं आपलं आयुष्य कोरण्याच्या प्रयत्नात आहेत. तिच्या धडपडीत डॅन नावाचा एक इरॅटिक मुलगा तिचा सहकारी आहे. डॅनबद्दल शिवलीला उत्सूकता आहे, प्रेम आहे की माहित नाही. डॅन मात्र…