धर्म आणि लष्कर या दोन अनार्थिक कचाट्यात इम्रान खान
इम्रान खान यांच्या पाकिस्तान तहरीके इन्साफ पक्षाला पाकिस्तानातल्या लोकसभा निवडणुकीत सर्वात जास्त जागा मिळाल्या पण बहुमत मिळालं नाही. सध्या तुरुंगवासी असलेल्या नवाझ शरीफ यांच्या पाकिस्तान मुस्लीम लीगला दोन नंबरच्या पण खान यांच्या पक्षाच्या जवळजवळ अर्ध्या जागा मिळाल्या. इम्रान खान इतर पक्षांची, बहुदा स्वतंत्र उमेदवारांची, मदत घेऊन पंतप्रधान होतील. क्रिकेटमधून निवृत्त झाल्यावर १९९६ साली इम्रान खान यांनी पाकिस्तान तहरीके इन्साफ हा पक्ष स्थापन केला. २००२ पासून ते लोकसभेत निवडून येत आहेत. मावळत्या लोकसभेत ते विरोधी पक्ष नेते होते. २०१३ साली झालेल्या…