मोदीशहा पार्टीची अपप्रचार मोहिम
मोदी-शहा पार्टीच्या वतीनं निवडणुकीची तयारी सुरू केलीय. देशाची आर्थिक स्थिती सुधारण्यात अपयश आल्यामुळं नाना मार्गांनी लोकांना वेडावण्याचे उद्योग मोदी-शहा पार्टीनं सुरु केलेत. मोदी हा एक थोर माणूस आहे असं लोकांना पटवणं हा त्यातला एक उद्योग. मोदींवर टीका करणारी माणसं वाईट्ट असतात असं मोदी-शहा पार्टी सतत सांगत असते. कार्यक्रम-मुद्दे यावरच्या चर्चेपासून दूर नेऊन लोकाना भावनांत गुंतवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. जनरल कर्णिक यांच्या नावानं एक वक्तव्य मिडियात फिरवलं जातय. त्याचा सारांश असा – मोदी हे थोर गृहस्थ असून लोक विनाकारण त्यांच्या…