गटारावरचं झाकण निघालं, दुर्गंधी व विषार हे वास्तव कळलं.
जे झालं ते बरंच झालं. पोलिस हे प्रकरण काय आहे ते कळलं तरी. सीबीआयचे उपसंचालक देवेंद्र कुमार अटकेत आहेत. लाचबाजीचा आरोप त्यांच्यावर आहे. सीबीआयचे संचालक राकेश अस्थाना यांच्यावर लाचबाजीचा आरोप असून त्यांची चौकशी चाललीय. त्यांनाही अटक होऊ शकते. सीबीआयचे विद्यमान संचालक आलोक वर्मा यांच्यावर अस्थाना यांनी लाचबाजीचा आरोप केला आहे. वर्मा आणि अस्थाना या दोघांनाही कामावरून दूर करून त्यांच्या जागी नागेश्वर राव या संचालकांची नेमणूक झाली. त्यांच्या विरोधातही सीबीआयमधे भ्रष्टाचाराच्या तक्रारी आहेत. थोडासा तपशील कळावा म्हणून राकेश अस्थाना यांचं उदाहरण…