दी इकॉनॉमिस्टचा १७५वा वाढदिवस
दी इकॉनॉमिस्ट या सुरवातीला लंडनहून प्रसिद्ध होणाऱ्या साप्ताहिकानं १७५ वर्षं पूर्ण केली. पावणेदोनशे वर्षाच्या काळात सारं जग अनेक स्थित्यंतरांतून गेलं. बहुतेक सगळी स्थित्यंतरं इकॉनॉमिस्टनं नोंदली, अभ्यासली. इकॉनॉमिस्टचे मालक संपादक विल्सन हे खटपट्ये, समाजात बदल घडवू पहाणारे सक्रीय कार्यकर्ते होते. कार्यकर्ता, विचारवंत आणि पत्रकार असं मिश्रण त्यांच्या व्यक्तिमत्वात होतं. अमेरिकन राज्यक्रांती, फ्रेंच राज्यक्रांती, ब्रीटननं घडवलेली औद्योगीक क्रांती या घटनांनी सारं जग बदलून टाकलं. जगभरात नवनवे विचार आणि विचारधारा या प्रसंगांतून जन्माला आला. या घालमेलीत लिबरलिझमचा विचार विल्सन यांनी घडवला. अॅडम स्मिथ,…