चला, आघाड्या तयार करण्याचा मोसम आलाय
चला, निवडणुक आली. कुठल्या आघाडीत जायचं ते ठरवा. देशव्यापी एकाद्या पक्षाचं राज्य असण्याचे दिवस संपलेत. भाजपच्या आघाडीनं बिहारमधलं लोकसभेचं जागा वाटप निश्चित केलंय. बिहारमधल्या ४० जागांमधल्या १७ जागा भाजपनं स्वतःकडं ठेवल्यात, १७ जागा नितीश कुमार यांच्या जदयुला दिल्यात आणि ६ जागा पासवान यांच्या लोकजनशक्ती पार्टीला दिल्यात. अगदी नेटकेच लोकसमता पार्टीचे कुशवाहा भाजप आघाडीतून बाहेर पडल्यानं त्यांना ५ जागा देण्याच्या संकटातून भाजप सुटला. लोकसमता पार्टी भाजप आघाडीला रामराम ठोकून काँग्रेस आघाडीत घुसलीय. काँग्रेस आघाडीचं जरा वेगळं आहे. बिहारमधली आघाडी काँग्रेस आघाडी…