आता जॉर्जही नाहीत….
२०४ चर्नी रोड. १९६७ ची स.का.पाटील यांना हरवणारी ऐतिहासिक निवडणुक जॉर्जनी इथून लढवली. या इमारतीत हिंदू मजदूर पंचायत, बाँबे लेबर युनियन, म्युनिसिपल मझदूर युनियन इत्यादी अनेक कामगार संघटनांच्या कचेऱ्या असत. संयुक्त समाजवादी पक्षाचंही कार्यालय इथंच होतं. जॉर्ज फर्नांडिस इथंच बसत. याच इमारतीत जॉर्ज यांची कामगार चळवळ कारकीर्द आकाराला आली. असं सांगतात की जॉर्ज मुंबईत प्रथम आले तेव्हां गोदीबाहेरच्या फूटपाथवर रहात आणि या कचेरीत येत. नंतर यथावकाश ते हाकेच्या अंतरावर ह्यूजेस रोडवरच्या पानगल्लीतल्या एका छोट्या घरात रहायला गेले. इमारतीच्या तळ मजल्यात एक बँक…