पुलवामानंतर….
पुलवामामधे जैशे महंमदच्या हस्तकानं सीआरपीएफच्या ४३ जवानांना ठार मारलं. नंतर भारतीय विमानांनी पाकिस्तानात खोलवर जाऊन जैशे महंमदच्या केंद्रावर हल्ला केला. नंतर पाकिस्तानी विमानानी भारतीय हद्दीत हल्ला केला. पाकिस्तानवर हल्ले करून त्या देशाचं जास्तीत जास्त नुकसान केलं पाहिजे अशी भावना भारतीय जनतेमधे फैलावली आहे. भाजप म्हणत आहे की पाकिस्तानला धडा शिकवण्याचं सामर्थ्य आणि इच्छाशक्ती केवळ त्यांच्याकडंच आहे, बाकीचे पक्ष कुचकामी आहेत, येत्या निवडणुकीत भाजपलाच निवडून द्या असा उघड प्रचार भाजप करत आहे. विरोधी पक्ष म्हणतात की पाकिस्तानवर कारवाई जरूर केली पाहिजे…