गांधी आणि मोदींच्या गरीबी निर्मूलन योजना
नरेंद्र मोदीनी किसान सम्मान योजनेतहत शेतकऱ्यांना वर्षाला ६ हजार रुपये देण्याची घोषणा केली. गरीब शेतकऱ्याला हे पैसे दिले जातील. शेतकऱ्याला इतर वाटांनी अनुदानं किंवा मदत दिली जात असेल तर ती थांबेल काय? की इतर कुठल्याही प्रकारची मदत मिळत असली तरी स्वतंत्रपणे हे सहा हजार म्हणजे महिना पाचशे रुपये मिळतील? शेतकऱ्याची दुर्दशा आहे कारण त्याच्याजवळ अगदी कमी जमीन आहे आणि ती जमिन कसून त्याचं पोट भरत नाही. सिंचन, वीज, बीबियाणं, खतं, जंतुनाशकं, कर्ज आणि शेतमालाला हमी भाव या बाबत सरकारनं अनुदानं,…