एनरॉन. भारतात गुन्हेगारांना शिक्षा होत नाही, त्यांची चौकशीही टाळता येते.
एनरॉनच्या दाभोळ प्रकल्पाची चौकशी सर्वोच्च न्यायालयानं थांबवलीय. १९९६ साली सुरू केलेल्या या चौकशीला आता अर्थ नाहीये असं सर्वोच्च न्यायालयाचं म्हणणं. एक तर चौकशी सुरु झाली होती ती एनरॉनबरोबर महाराष्ट्र राज्य वीज मंडळानं केलेल्या खरेदी करारातील घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी. आता एनरॉन दाभोलमधे नाही, दोन सरकारी उपक्रम मिळून दाभोल वीज निर्मिती केंद्र चालवतात. मूळ आरोपीच गायब. दुसरं म्हणजे शरद पवार, बाळ ठाकरे, गोपीनाथ मुंडे, मनोहर जोशी अटल बिहारी वाजपेयी यांच्या वर्तनाची चौकशी न्यायालयीन चौकशीत व्हायची होती. त्या पैकी आता फक्त शरद…