वंशद्वेषाचा प्रश्न हाताळणाऱ्या सिनेमाला ऑस्कर
कारचा गोरा ड्रायव्हर आणि काळा मालक यांच्यातलं घट्ट होत गेलेलं मैत्रीचं नाट्य दाखवणारा ग्रीन बुक यंदा सर्वोत्तम ऑस्कर चित्रपट ठरला. सहायक अभिनेता (माहेरशाला अली) आणि पटकथेचीही ऑस्कर चित्रपटाला मिळाली. १९६० च्या दशकातलं कथानक आहे. डोनल्ड शर्ली हा काळा नामांकित संगीतकार अमेरिकेत वर्णद्वेषासाठी प्रसिद्ध असलेल्या गावांचा दौरा काढतो, त्यासाठी टोनी लिप या गोऱ्या माणसाला ड्रायव्हर कम सहाय्यक म्हणून पगारी नोकर म्हणून ठेवतो. शर्ली एका प्रतिष्ठित सुस्थित काळ्या घरात वाढलेला भरपूर शिकलेला आणि अत्यंत ऊच्चवर्णीय गोऱ्या संस्कृती व शिष्टाचारात वाढलेला माणूस असतो….