हाँगकाँगला लोकशाही हवीय
हाँगकाँगला लोकशाही हवीय केवळ नागरी स्वातंत्र्य नव्हे आम्हाला लोकशाही हवीय असं म्हणत हाँगकाँगचे २० लाख नागरीक १२ जूनला रस्त्यावर उतरले. चिनी संस्कृतीची गंमत. चीनच्या पेपरांतून, कम्युनिष्ट पक्षाच्या पेपरांतून, हाँगकाँगचं वर्णन सहोदर असं केलं जातं. सहोदर म्हणजे एकाच आईच्या पोटातून जन्मलेली मुलं. चिनी सोशल मिडियात आणि पेपरांत लोकांनी कळकळून लेख लिहिले. कर्तृत्ववान आईनं जन्म दिलेलं हाँगकाँग हे मूल काही काळ ब्रिटीशांनी दत्तक घेतलं होतं. ते आता आईकडं परत आलंय. पण मधल्या काळात ते बिघडलं. आता आईकडं परत आल्यावर मुलानं आईचं म्हणणं…