राजा आपला वारस नेमतोे
पुस्तकातून पुस्तकं म्हणजे दीर्घकाळ किवा कायम टिकणारा मजकूर, कापुरासारखा पटकन उडून जाणारा मजकूर नव्हे. पुस्तकात खूप म्हणजे खूपच रंजक आणि उदबोधक मजकूर असतो. ।। अमेरिकन मुत्सद्दी बर्न्स यांनी लिहिलेल्या आठवणींचं पुस्तक. ।। जॉर्डनचे राजे हुसेन यांचा मृत्यू झाला आणि त्यांचा मुलगा अब्दुल्ला जॉर्डनचा राजा झाला. राजाचा मृत्यू होतो. राजाचा मुलगा राजा होतो. किती साधी आणि साहजीक घटना वाटते ना? पण तसं नसतं. या घटनेला कितीतरी कंगोरे असतात. जॉर्डनचे राजे हुसेन १९९८ साली अमेरिकेत कॅन्सरवर उपचार घेत होते. त्यांच्या अनुपस्थितीत क्राऊन…