जेटलींचं मरण आणि राम सेतू
केंद्रीय विकास मंत्री निशांक यांनी खरगपूरच्या आयआयटीतल्या इंजिनयरिंग विद्यार्थ्यांना राम सेतू या विषयावर संशोधन करण्याचा सल्ला दिला. राम सेतू असं नाव दिलेली दगडांची रांग भारत आणि लंका यांच्यामधल्या समुद्रात आहे. निशांक ज्या दगडांच्या रांगेचा उल्लेख करतात त्यालाच राम सेतू हे नाव अगदीच अलीकडं देण्यात आलंय. त्या आधी ती रांग अॅडमचा पूल म्हणून ओळखली जात होती. ख्रिस्ती समजुतीनुसार अॅडम शिक्षा झाल्यावर पृथ्वीवर पडला तो या पुलाच्या जागी असं काहींचं म्हणणं. लंका मुळात कुठं होती यावर अनेक मतं आहे. मालदीव बेटं…