लोकशाहीचं मातेरं
ब्रिटीश संसद दीर्घ काळ बरखास्त करण्याचा बोरिस जॉन्सन यांचा निर्णय ब्रीटनच्या सर्वोच्च न्यायालयानं बेकायदेशीर, निराधार, अनावश्यक ठरवून रद्द केला. संसदेचं कामकाज किती दिवस चालवायचं, केव्हां स्थगित करायचं, संसद बरखास्त करून निवडणुका केव्हा घ्यायचा हे निर्णय सरकारचा अधिकार असतो. राणीनं शिक्का मोर्तब केल्यानंतर तो निर्णय अमलात येत असतो. प्रधान मंत्री राणीला (किंवा राजाला-मोनार्क) सल्ला देतो. राणीला ब्रिटीश परंपरांचे जाणकार, प्रीवीकाऊन्सीलचे सदस्य सल्ला देतात. राणीच्या संमतीनं निर्णय घेण्याची प्रथा ब्रिटीश लोकशाहीत आहे. राणीला सल्ला मान्य नसेल तर राणी खाजगीत चर्चा करते,…