डफ्लो-बॅनर्जी, नोबेल विजेता सिद्धांत
जगभर अजूनही अब्जावधी माणसं गरीब आहेत, अशिक्षित आहेत, योग्य आरोग्यापासून वंचित आहेत. जगभरची सरकारं गरीबी आणि त्यातून उद्भवलेले त्रास नष्ट करण्यासाठी अब्जावधी खर्च करत आहेत. ।। एस्थर डफ्लो आणि अभिजित बॅनर्जी यांना अर्थशास्त्राचं नोबेल पारितोषिक मिळाल्यानंतर भारतात प्रतिक्रियांच्या लाटा आल्या. डावे आणि उजवे, सेक्युलर आणि देवपरमार्थवादी, अशा दोन्ही गटातल्या लोकांनी डफ्लो-बॅनर्जीवर झोड उठवली. तिकडं बॅनर्जी आणि नरेंद्र मोदी यांच्यात स्वतंत्रपणे एक चर्चाभेट झाली. डफ्लो आणि बॅनर्जी यांच्यावर झालेली टीका अनाठायी आणि अज्ञानमूलक आहे. डफ्लो आणि बॅनर्जी यांनी गरीबी निर्मूलन या…