जेएनयू विद्यार्थ्यांचं आंदोलन
जवाहरलाल नेहरू युनिवर्सिटीचे विद्यार्थी आणि प्रशासन यांच्यात लढाई जुंपली आहे. फीवाढ आणि विद्यार्थ्यानं परिसरात कसं वागायचं हे दोन मुद्दे धसाला लागले आहेत. ही लढाई सध्या तरी एक विश्वशाळा आणि ती चालवणारं सरकार यांच्यातली आहे. लढाईत अर्थातच त्या पलिकडचेही अधिक व्यापक मुद्दे गुंतलेले आहेत. त्यामधे भारताचं आजचं शैक्षणीक आणि आर्थिक वास्तव गुंतलेलं आहे. त्यामधे हिंदुत्ववादी विचारांपेक्षा वेगळे विचार देशातून उखडून टाकायचे हा हिंदुत्ववादी विचार गुंतलेला आहे. १९६९ साली न्या. छागला यांच्या पुढाकारानं जेएनयू निर्माण झाली. पुरोगामी विचार, समाजवाद या विषयांचा अभ्यास…