राजीव गांधींचा खून, कां व कसा.
राजीव गांधींचा खून कां झाला? राजीव गांधी-कारण-राजकारण. ले. नीना गोपाल. मनोविकास प्रकाशन. )( १८१५ साली ब्रिटिशांनी डचांकडून श्रीलंका घेतली. कारभार चालवण्यासाठी तेव्हां भारतातल्या तामिळनाडूतले तमिळ त्यांना उपयोगी ठरले कारण तमिळ लोकं इंग्रजी शिकलेले होते, कारभार-साहित्य इत्यादी बाबतीत तरबेज होते. १९४८ साली लंका स्वतंत्र झाली तेव्हां लंकेतल्या सरकारी नोकऱ्यांतल्या ६० टक्के नोकऱ्यात तमिळ होते, विद्यापीठांत त्यांचंचं वर्चस्व होतं. लोकसंख्येत १५ टक्के असले तरी तमिळाना वाटे की लंका हा त्यांचाच देश आहे. लंका हा बहुसंख्य सिंहलींचा, बौद्ध धर्मियांचा देश. १९५६ साली लंकेनं…