बुद्धीमान बंडखोर लेखिका
वेवर्ड अँड वाईज या पुस्तकांच्या दुकानातल्या एका फेरीत विराट चांडोक यांच्या टेबलावर नव्यानं मागवलेल्या पुस्तकांचे गठ्ठे होते. त्यात सुझन सोंटॅग अमेरिकन लेखिकेच्या पुस्तकांची एक चळत होती. चळतीत ऑन फोटोग्राफी या पुस्तकाच्या दहा प्रती होत्या.ऑन फोटोग्राफी हे पुस्तक १९७७ साली प्रसिद्ध झालं होतं. मला आश्चर्य वाटलं. १९६० च्या दशकातल्या एका अमेरिकन लेखिकेची पुस्तकं मुंबईतल्या पुस्तकांच्या दुकानात? पटकन मला आठवलं की या बाईंना मी फार वर्षांपूर्वी वाचलं होतं. त्यांच्याबद्दल लोकांची टोकाची मतं होती. काही लोक त्यांना आउटस्टँगिंग लेखिका मानत होते तर काही…