करोना. विकलांग समाजावर रोगाचा हल्ला.
करोना संकट पूर्वार्ध करोना संकटानं सारं जग हादरलय. सारं जग आपापल्या अर्थव्यवस्था तपासून पाहू लागलं आहे. अमेरिका आणि युरोपीय देश मानत होते की त्यांचं उत्तम चाललंय. चीनही तसंच मानत होता. आपापल्या अर्थव्यस्था उत्तम आहेत आणि आपापले अर्थविचार एकदम फिट आहेत असं ते सर्व मानत होते. करोना व्हायरसनं त्या सर्वांचे तीन तेरा वाजवलेत. त्यांच्या अर्थव्यवस्था संकट सहन करण्यास लायक नव्हत्या हे त्यांच्या लक्षात आलंय. करोना संकट उभं रहायच्या वर्षभर आधी अमेरिकेत सुमारे १.२ कोटी माणसांना पुरेसं वेतन वा उत्पन्न मिळत नव्हतं….