Browsed by
Month: April 2020

पालघर घटना. नव्या कंडीला वाव.

पालघर घटना. नव्या कंडीला वाव.

पालघरला जमावानं तीन माणसांना ठार केलं.   घटना घडून काही तासही उलटले नाहीत आणि सोशल मीडियात पोस्टींचा पूर आला.  भगव्या कपड्यातली माणसं साधू होती,  मुस्लीम जिहादींनी त्याना मारलं.  मारणारी माणसं हिंदू होती, भाजपची होती, ते गाव भाजपचं होतं आणि भाजपचा सरपंच होता.  पोलीस घटनेच्या ठिकाणी हजर होते पण त्यांनी बघ्याची भूमिका घेतली.   पाकिस्तानी लोकांचा हा कट आहे, काश्मिरात रचण्यात आला, तबलिगी त्यात सामिल होते. महाराष्ट्र सरकार त्यात सामिल कारण पोलिसानं बघ्याची भूमिका घेतली.  भाजपच्या लोकांनी महाराष्ट्र सरकारला बदनाम करण्यासाठी…

Read More Read More

चोऱ्या करा, लूट करा.तुम्हाला अभय आहे. तुम्हाला महाबळेश्वर खुले आहे.

चोऱ्या करा, लूट करा.तुम्हाला अभय आहे. तुम्हाला महाबळेश्वर खुले आहे.

कपील वाधवान आणि धीरज वाधवान यांना सीबीआयनं १७ मार्च २०२० रोजी मुंबई कार्यालयात जाबजबाबासाठी हजर रहाण्याची नोटीस बजावली होती. ही तिसरी नोटीस होती. ही नोटीस  अजामीनपात्र होती. डीएचएफएल या आपल्या कंपनीच्या मार्फत त्यांनी केलेल्या आर्थिक गुन्ह्यांची चौकशी सीबीआयला करायची होती. त्या आधी दोन वेळा नोटीस बजावली असूनही दोघे हजर राहिले नव्हते. मामला शेपाचशे रुपयांचा नव्हता. सुमारे ९६,८८० हजार कोटींचा मामला होता. १७ मार्चला वाधवान बंधू हजर झाले नाहीत. सरकारला उत्तर पाठवतांना वाधवान म्हणाले की करोना पर्व सुरू झाल्यानं त्यांना प्रवास…

Read More Read More

करोना थकून मरावा, माणसं जिवंत रहावीत.

करोना थकून मरावा, माणसं जिवंत रहावीत.

करोना संकटामुळं बेकार आणि धनहीन झालेल्या कोट्यावधी नागरिकांना जगवण्यासाठी भारत सरकार जनधन योजनेतहत दर नागरिकाच्या खात्यावर ५०० रुपये थेट पोचवणार आहे.  महाराष्ट्रात सुमारे ८० लाख आदिवासी आहेत. लॉक डाऊन झाला तेव्हां ते आपल्या पाड्यापासून पाच पन्नास मैल अंतरावर कामासाठी गेले होते. कामं बंद झाली, घरी परतण्यावाचून गत्यंतर नाही, एसटी नाही, रेलवे नाही, ही माणसं पायी पायी आपापल्या घरी पोचली. या ८० लाख लोकांपैकी किती लोकांकडं आधार कार्ड आहे, किती लोकांकडं रेशन कार्ड आहे, किती लोकांचं जनधन खातं आहे याचा आकडा…

Read More Read More

आरोग्य व्यवस्था सरकारच्या ताब्यात, सरकारवर जनहिताचा वचक.

आरोग्य व्यवस्था सरकारच्या ताब्यात, सरकारवर जनहिताचा वचक.

भारताला नवं आर्थिक धोरण हवं. आरोग्य आणि शिक्षण या दोन मुद्दे हा त्या धोरणाचा मूलाधार असावा, अग्रक्रम असावा.   आयुष्मान भारत या आरोग्य कार्यक्रमाचं उद्दिष्ट सांगण्यासाठी सरकारनं दिलेल्या आकडेवारीनुसार ५० कोटी माणसांना चिकित्सा आणि उपचार परवडत नाहीत.  जे उत्पन्न मिळतं त्यात पोट जेमतेम भागतं , आरोग्य आणि शिक्षण या दोन अत्यावश्यक पाया गरजा भागवण्यासाठीही त्यांच्याकडं पैसे नाहीत. बरेच लोक कर्ज काढून आरोग्य गरजा भागवतात. त्या ५० कोटी लोकांची आर्थिक स्थिती सुधारणं ही पहिली गरज.  त्याना पैसे खर्च न करावे लागता…

Read More Read More