स्थलांतरीत आणि स्थलांतरीत नसलेले, सर्वानाच जगण्यासाठी नवी व्यवस्था उभारावी लागेल.
मुंबईतल्या धारावीतल्या हज्जारो अधांतरी लोकांनी रस्त्यावर रांगा लावल्या, बसमधे बसण्यासाठी. बस जाणार होती रेलवेच्या डब्यापर्यंत, रेलवेचा डबा जाणार होता त्यांच्या बिहार, उत्तर प्रदेश, ओदिसा, बंगालमधल्या गावापर्यंत. मुंबईत इतर ठिकाणीही माणसं रेलवे स्टेशनांत गेली, मुंबई सोडण्यासाठी. यांची संख्या काही लाख. ही माणसं दहा बाय दहाच्या घरात रहात, दहा बाय दहाच्या खोलीत खाद्यपदार्थ किंवा प्लास्टिक किंवा चामड्यांच्या वस्तूंचं उत्पादन करत. यांचं दाटीवाटीचं जगणं अत्यंत म्हणजे अत्यंत अनारोग्यकारक होतं. लातूरमधले डाळ मिल, तेल एक्स्ट्रॅक्शन प्लॅंट इत्यादी ठिकाणी काम करणाऱ्या सुमारे १० हजार मजुरांनी…