लोकशाहीचा वापर करून लोकशाही संपवणारे…
डोनल्ड ट्रंप यांचे नॅशनल सेक्युरिटी सल्लागार जॉन बोल्टन यांचं पुस्तक प्रसिद्ध झालंय. पुस्तकाचं नाव आहे द रूम व्हेअर इट हॅपंड. या पुस्तकात बोल्टन यांनी ट्रंप यांचे विचार, कामाची पद्धत, धोरणं इत्यादी बाबत आपला अनुभव लिहिला आहे. सी जिन पिंग यांच्याशी वाटाघाटी करताना ट्रंप यांनी काही अमेरिकन शेतमाल चीननं खरेदी करावा, त्यामुळं शेतकऱ्यांची मतं त्याना मिळतील आणि त्यामुळं ते पुन्हा निवडून येतील असं सी जिन पिंगना सांगितलं. त्या वेळी अमेरिका आणि चीन यांच्यात व्यापार युद्ध चालू होतं, चीनचा माल आयात करायचा…