सत्ता मिळवण्यासाठी व्यवस्थेचा बळी
निवडून येणं आणि सत्ता हस्तगत करणं हा प्रत्येक व्यक्ती आणि पक्षाचा घटनादत्त अधिकार असतो. पण हा अधिकार घटनादत्त आहे असं म्हणणं म्हणजेच घटनेचं महत्व मानणं होय, घटनेत सुचवल्याप्रमाणं सत्ताग्रहण केलं जावं अशी अपेक्षा असते. डोनल्ड ट्रंप यांना राज्यघटनेनुसार पुन्हा प्रेसिडेंट व्हायचं आहे पण घटनेनं दिलेली पथ्थ्यं पाळायला ट्रंप तयार नाहीत. निवडून येण्यासाठी ते घटना पायदळी तुडवायला तयार आहेत हे गेल्या आठवड्यातल्या त्यांच्या वर्तणुकीतून दिसलं. डोनल्ड ट्रंप यांनी पोर्टलँड (ओरेगन) या शहरात फेडरल एजंट्स पाठवले, तिथलं आंदोलन दडपण्यासाठी. सीएनएननं दाखवलेल्या दृश्यांनुसार…