कमला हॅरिस यांचं पुस्तक
चेन्नईत, तामिळनाडूतल्या रस्त्यांच्या कडेला, कमला हॅरिस यांची स्थानिक चित्रकारांनी रंगवलेली चित्रं दिव्याच्या खांबाला लटकली आहेत. कित्येक चित्रं तर अशी की त्यावर नाव लिहिलंय म्हणून त्या कमला हॅरिस आहेत हे लक्षात येतं अन्यथा ते इतर कोणाही स्त्रीचं चित्र वाटलं असतं. तामिळनाडूतल्या बऱ्याच राजकीय व्यक्तींच्या चित्रांच्या बाबतीत ते खरं आहे. अम्मा असोत की बाबासाहेब. व्यक्ती पदावर पोचली की ती मोठी होते. कमला हॅरिस अमेरिकेच्या उपाध्यक्षपदाच्या उमेदवार झाल्यावर जगाचं आणि अर्थातच भारताचं लक्ष त्यांच्याकडं गेलं. गेल्या वर्षी त्यांचं The Truth We Hold हे…