हमी भाव देऊन मोकळे व्हा
पंजाबमधले शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. केंद्र सरकारनं केलेली शेती कायदे रद्द करा अशी त्यांची मागणी आहे. केंद्र सरकारच्या शेती कायद्याचं मुख्य सूत्र शेतमालाची खरेदी कोणीही करू शकेल असं आहे. देशातली सध्याची व्यवस्था अशी. शेतमालाचा हमी भाव सरकार ठरवतं.पण त्या भावात खरेदी करायला सरकार बांधील नाही. सरकारं वेळोवेळी हमी भाव जाहीर करतात आणि त्या भावात खरेदी करण्याचा निर्णय सरकार घेतं. परंतू तसा कायदा नाही. हमी भावात खरेदीची एक व्यवस्था तयार झाली आहे. सरकारतर्फे उभं केलेलं एक मार्केट असतं. शेतकरी धान्य तिथं नेतो….