Browsed by
Month: January 2021

गाढव समाज नष्ट होणार? इटालियन वडापाव, २७ वा जेम्स बाँड, अरब स्प्रिंग

गाढव समाज नष्ट होणार? इटालियन वडापाव, २७ वा जेम्स बाँड, अरब स्प्रिंग

हां हां म्हणता अरब स्प्रिंगला १० वर्ष झाली.  ट्युनिशियात २०१० च्या डिसेंबर महिन्यात बौझिझी या तरुणानं स्वतःला जाळून घेतलं.  तो फेरीवाला होता. गाडीवर फळं विकत फिरत असे. कुठंही गाडा उभा केला की पोलीस लाच मागत. दररोजची लाच आणि उत्पन्न यात मेळ बसेनासा झाला. संध्याकाळी घरी परतल्यावर आठ माणसांच्या पोटात पुरेसं अन्न घालायला त्याच्याजवळ पैसे उरलेले नसत. शेवटी कंटाळून त्यानं सरकारी कार्यालयासमोर स्वतःला जाळून घेतलं.  बातमी देशभर पसरली. तरूण रस्त्यावर उतरले. त्यांनी पंतप्रधान बेन अली यांचा राजीनामा मागितला. बेन अलीनी पोलिसी…

Read More Read More

ट्रंप गमन. राष्ट्रपती बारमधे. त्रिभंग. १८० वर्षं जुनं पुस्तक दुकान.

ट्रंप गमन. राष्ट्रपती बारमधे. त्रिभंग. १८० वर्षं जुनं पुस्तक दुकान.

फेरफटका ४ ।। डोनल्ड ट्रंप चोरट्यासारखे व्हाईट हाऊस सोडून गेले. जाण्यापूर्वी त्यानी निवडून आलेले जो बायडन यांची भेट घेतली नाही, त्यांना शुभचिंतन केलं नाही. व्हाईट हाऊस सोडायच्या आधी सामानाची बांधाबांध करत असताना ते गुन्हेगारांसाठी माफीपत्रं तयार करत होते. एकूण सुमारे १७५ लोकांना त्यांनी माफी दिली. बहुतेक सर्वांनी फ्रॉड, सार्वजनिक पैशाचा गैरवापर, कर चुकवणं,सत्तेचा गैरवापर करणं अशा स्वरूपाचे फौजदारी गुन्हे केले होते. एक उदाहरण लक्षात ठेवण्यासारखं आहे. स्टीव बॅनन या ट्रंप यांच्या सहकाऱ्यावर मेक्सको भिंत बांधणं या व्यवहारात भ्रष्टाचार केल्याचा आरोप…

Read More Read More

अरब स्प्रिंग, नरसंहारांवरच्या डॉक्युमेंटऱ्या,प्रेसिडेंट, व्यक्ती नव्हे एक वस्तू, गाढव समाज नष्ट होण्याची भीती.

अरब स्प्रिंग, नरसंहारांवरच्या डॉक्युमेंटऱ्या,प्रेसिडेंट, व्यक्ती नव्हे एक वस्तू, गाढव समाज नष्ट होण्याची भीती.

अरब स्प्रिंग, मागले पाढे पंचावन्न. १० वर्षांपूर्वी ट्युनिशियात महंमद बुआझिझी या फेरीवाल्यानं स्वतःला जाळलं आणि अरब स्प्रिंग क्रांती उफाळून आली. येमेन, लिबिया, इजिप्त, सीरिया या देशात तरुणांनी बंडं केली. तरुणांची मुख्य मागणी लोकशाही आणि स्वातंत्र्याची होती.   एकट्या ट्युनिशियात सत्ता बदल झाला, तिथं लोकशाही सुरु झाली. येमेन, सीरिया आणि लिबियात यादवी माजली, सत्ता आणि दडपशाही टिकून राहिली. इराक, लेबनॉन, सुदान, सुदान मधे स्थिती २०१० च्या तुलनेत जर्राशी बदलली. इजिप्तमधे अल सिसि यांची हुकूमशाही आणखी मजबूत झाली. सौदी अरेबियात महंमद सुलतान…

Read More Read More

अमेरिकला दंगा, राज्यघटना,वाईन योगा, गोल्डा मेयर.

अमेरिकला दंगा, राज्यघटना,वाईन योगा, गोल्डा मेयर.

फेरफटका २ ट्रंप यांची लोकशाहीची नवी व्याख्या. निवडणुकीतला पराजय जिव्हारी झोंबलेल्या डोनल्ड ट्रंप यांनी गुंडांना चिथावलं आणि संसदेवर पाठवलं. काँग्रेस आणि सेनेट या दोन सभागृहांची नवनिर्वाचित अध्यक्ष जो बायडन यांच्या निवडीवर मोहोर उमटवण्याची बैठक चालली होती. ट्रंप यांच्या गुंडांनी सभागृहावर हल्ला केला, मोडतोड केली, सभापतींच्या दालनात धुडगूस घातला. रक्षकांशी झालेल्या झटापटीत चार माणसं मेली. या घटनेच्या आधी तीन दिवस ट्रंपनी  जॉर्जियाच्या गव्हर्नला फोन करून सांगितलं ज्या ११ हजार ७ शे मतांनी मी हरलो ती मतं मला परत द्या, जॉर्जियातली मतं रद्द…

Read More Read More

कोरोना, स्टेटलेस, दंतकथा.

कोरोना, स्टेटलेस, दंतकथा.

चला जगात एक फेरफटका मारूया. कोरोनाचा सर्वात भीषण फटका अमेरिकेला बसलाय. सध्या तिथं सुमारे २० लाख माणसांना कोरोनाची बाधा झालीय, सव्वा लाख पेशंट्स हॉस्पिटलात दाखल आहेत, आता अधीक पेशंट घेण्याची क्षमता आरोग्य व्यवस्थेत राहिलेली नाही. सुमारे साडेतीन लाख माणसं मेलीत, दररोज साडेतीन हजार माणसं मरत आहेत. घरातला मिळवता माणूस जिवंत नाही, उद्योग वगैरे बंद असल्यानं घरातली मिळवती माणसं बेकार, अशा अवस्थेत सुमारे २ कोटी माणसांना कोणी तरी मदत केली तरच ती घरात राहू शकतील, जगू शकतील. सरकारी मदत येवढा एकच…

Read More Read More