‘ सर ‘ एक चांगली फिल्म
सर ही फिल्म २०१८ साली तयार झाली होती, आता ती नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालीय. रत्ना आणि आश्विन अशा दोघांमधल्या संबंधांची ही गोष्ट आहे. आश्विन या एका श्रीमंत तरूणाच्या घरी रत्ना मोलरीण म्हणून कामाला लागते. रत्ना गावाकडून आलेली, आश्विन न्यू यॉर्क-मुंबईवाला. चित्रपटाच्या सुरवातीला आश्विन हा रत्नाचा सर असतो, चित्रपट संपता संपता तो रत्नाचा आश्विन होतो. अगदीच भिन्न परिस्थितीत वाढलेल्या दोन व्यक्ती एकजीव होण्याचा प्रवास चित्रपटात आहे. चित्रपटाचा विशेष असा की त्यात दृश्याला, दिसण्याला महत्व आहे. ऐकणं कमी आहे. रत्ना आणि आश्विन यांच्यातले…