वसंत वाचनालय, टिकून आहे.
मुंबईत, शिवाजी पार्क मैदानापासून एक गल्ली सोडून दुसऱ्या समांतर गल्लीच्या तोंडाशी वसंत वाचनालय आहे. वाचनालयातून बारे पडून काही पावलं गेलं की समोर सेनाभवनावरचं बाळासाहेब ठाकरे यांचं भव्य चित्र दिसतं. वसंत वाचनालय १९५८ साली स्थापन झालं. वसंतराव सावकर यांची चालवलेलं ते खाजगी वाचनालय आहे. आज म्हणजे दोन हजार एकवीस सालाच्या मार्च महिन्यात तिथं गेलं तर शाळकरी मुलं, तरूण, वयस्क दाटीवाटीनं उभं राहून पुस्तकं चाळतांना दिसतात. पलिकडच्या शिवाजी पार्कच्या कट्ट्यावर बसलेल्या वयस्कांची चर्चा ओझरती ऐकलीत तरी त्यात अलीकडं वाचन संपलेलं…