इस्रायलची गुंडगिरी
इस्रायल आणि पॅलेस्टाईन या दोन देशांमधे एक लघुयुद्ध पार पडलं. इस्रायलची सुमारे २० माणसं मेली. २२० पेक्षा अधिक पॅलेस्टिनी इस्रायलच्या क्षेपणास्त्रांचा बळी ठरले. गाझा दाट वस्तीचा प्रदेश आहे. एक इमारत जमीनदोस्त होते तेव्हां पाच पन्नास माणसं मरतात. त्यामुळं पॅलेस्टाईनमधे २२० माणसं मरणं ही गोष्ट नित्याची अपेक्षीत आहे. इस्रायलच्या दक्षिण भागात गाझातून सोडलेली रॉकेटं पोचणं आणि तिथल्या इमारती उध्वस्थ होणं ही घटना पहिल्यांदाच घडली आहे. गाझामधून किंवा लेबनॉनमधून आलेली रॉकेटं हवेतल्या हवेतच छेदण्याची यंत्रणा इस्रायलकडं असूनही काही रॉकेटं इस्रायलमधे पोचणं ही घटना…