Browsed by
Month: June 2021

अती,विकृत, प्रसिद्धीचे दुष्परिणाम.

अती,विकृत, प्रसिद्धीचे दुष्परिणाम.

नेओमी ओसाका, रोलाँ गारो (पॅरिस) टेनीस स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीनंतर पत्रकारांसमोर होती. एका पत्रकारानं विचारलं ” तुला मिळणारी प्रसिद्धी,तुझं जिंकणं हे सगळं जरा अतीच होताहे असं नाही वाटत तुला?” नेओमी गप्प झाली. गळा दाटून आलाय हे दिसत होतं. तिच्या डोळ्यात अश्रू आले. पत्रकार परिषद आयोजित करणाऱ्या माणसाला तिनं विचारलं ” मी परिषद सोडून गेले तर चालेल? मला नाही पत्रकारांशी बोलायचंय.” आयोजक विचार करत होते तेवढ्यात ओसाका उठून निघूनही गेली. पत्रकारांशी बोललंच पाहिजे असा स्पर्धेचा नियम आहे. तो नेओमीनं मोडला. स्पर्धेनं तिला १५ हजार युरो दंड केला….

Read More Read More

बेलिंग कॅट

बेलिंग कॅट

सत्य आणि सत्ता यांना आव्हान देणारं ” वृत्तपत्र “ बेलिंग कॅट म्हणजे मांजराच्या गळ्यात घंटा बांधणं. सध्या खोट्या बातम्या, खोटी माहिती नावाचा  बोका मोकाट सुटलाय. या बोक्यापासून  सावध रहा, तो तुमचं दूधलोणी फस्त करणार आहे असं बेलिंग कॅट नावाची माध्यमसंस्था सांगतेय. खोटी माहिती प्रतिष्ठा धारण करत असताना बेलिंग कॅट खरी माहिती, इन्फर्मेशन लोकांसमोर ठेवतंय.  प्रस्तुत We Are Bellingcat: An Intelligence Agency for the People हे पुस्तक बेलिंग कॅट संघटनेने केलेले उद्योग वाचकांसमोर ठेवतं.  बेलिंग कॅटचं ध्येय, बोधवाक्य आहे, ” सत्य शोधा, तपासून पहा, प्रसार करा.” बेलिंगकॅट या संघटनेनं अॅलेक्सी नेवालनी या पुतीनना…

Read More Read More

कोविड, कुत्रा आणि ट्रंप

कोविड, कुत्रा आणि ट्रंप

बारा मार्च हा दिवस १० डाऊनिंग स्ट्रीटमधे, म्हणजे पंतप्राधानाच्या अधिकृत निवासाचा, धकाधकीचा होता. पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांचे सल्लागार, विविध खात्यांतले सनदी अधिकारी आणि जॉन्सची मैत्रिण कम पार्टनर केरी सिमंड्स अशी नाना माणसं नाना निर्णयाच्या घालमेलीत होती. कोविडनं फणा काढली होती. लशींचा पत्ता नव्हता. लॉक डाऊन करणं येवढा एकच मार्ग दिसत होता. बोरीस जॉन्सन लॉकडाऊनला तयार नव्हते. लॉक  डाऊन केला की व्यवहार थांबणार, व्यवहार थांबले की अर्थव्यवस्थेवर परिणाम होणार. तेव्हां लॉक डाउन नको, असं  जॉन्सनचं मत होतं. अगदी नेटकंच बोरिस जॉन्सन १० डाऊनिंग…

Read More Read More

एका प्रेसिडेंटच्या मुलाची गोष्ट

एका प्रेसिडेंटच्या मुलाची गोष्ट

ब्युटिफुल थिंग्ज ।। अमेरिकन समाजाची एकूण स्थिती आणि तिथलं राजकारण कसं (भयानक?) झालंय याचं प्रत्यंतर अनवधानानं एका ताज्या पुस्तकात घडलंय.  काल परवाच प्रसिद्ध झालेलं हे पुस्तक म्हणजे अमेरिकेचे प्रेसिडेंट जो बायडन यांचा मुलगा हंटर बायडन याच्या आठवणी. किंवा असंही म्हणावं की हे पुस्तक म्हणजे हंटर यांची कबुली आहे. पुस्तकाचं नाव आहे ब्युटिफुल थिंग्ज. हंटरचा अत्यंत प्रिय भाऊ बो यानं मरण्याच्या आधी अत्यंत व्याकुळ क्षणी घराच्या व्हरांड्यातून बाहेरचं निसर्ग सौंदर्य हंटरला दाखवलं आणि ब्युटिफूल येवढाच शब्द उच्चारला. त्यावरून हंटरनं हे शीर्षक…

Read More Read More