पेगॅसस. अर्थ, अनर्थ.
पेगॅससनं जगभर गोंधळ माजवलाय. हेरगिरी करणारं हे सॉफ्टवेअर आपण विकत घेतलंय की नाही, त्याचा वापर आपण करतोय की नाही ते सांगायला भारत सरकार तयार नाहीये. अमेरिकन संसद या सॉफ्टवेअरवर बंदी घालायचा विचार करतेय. एनएसओ या कंपनीचं हे सॉफ्टवेअर सध्या जगातले काही देश आणि देशप्रमुख आपले विरोधक आणि लोकशाही खतम करण्यासाठी वापरत आहेत. काय आहे हे पेगॅसस? पेगॅसस हे एक स्पायवेअर आहे, एक हेरगिरी करणारं सॉफ्टवेअर आहे. सरकारं ते विकत घेतात. सरकार त्या सॉफ्टवेअरचा वापर करून एक मेसेज नागरिकाच्या फोनवर, व्हॉट्सअपवर,…