भीषण सत्ताकारण.
काबूल विमानतळावर दोन स्फोट झाले. त्यात साठेक माणसं मेली आणि सुमारे दीडशे जखमी झाली. काबूल विमानतळाच्या आसपास हजारो माणसं देशाबाहेर जाण्याच्या खटपटीत गोळा झाली होती, विमानतळावर प्रवेश मिळेल, विमानात प्रवेश मिळेल, स्थलांतरीत होता येईल या आशेनं. याच गर्दीत एक अब्दुल नावाचा माणूस होता. दूरच्या हेलमांड प्रांतातून तो चंबुगवाळं आवरून काबूलमधे पोचला होता. त्याच्याकडं कागदपत्रं होती. गेली आठेक वर्षं तो ब्रिटीश फौजांना मदत करत असे. त्याचं काम असं. दरी,पश्तू भाषेतील कागदपत्रं आणि संभाषणं अनुवादून ब्रिटीश फौजाना, अफगाण सैनिक व पोलिसांना सांगणं. अब्दुल स्थानिक असल्यानं त्याला…