यशस्वी आणि लोकप्रिय अँजेला मर्केल स्वतःहून सत्तेतून निवृत्त झाल्या.
अँजेला मर्कल जर्मनीच्या चॅन्सेलरपदावरून निवृत्त झाल्या. त्यांचं बरं चाललं होतं. ७५ टक्के जर्मन जनतेला त्यांचं नेतृत्व पसंत होतं. त्यांच्या कोविड हाताळणीवर ८५ टक्के जनता खुष होती. जर्मनीतच नव्हे तर साऱ्या युरोपातल्या जनतेनं त्यांचं नेतृत्व मान्य केलं होतं. आणखी चारआठ वर्ष जरी त्या सत्तेत रहात्या तरी लोकांना ते हवं होतं. आज तरी त्यांच्यायेवढं समर्थ नेतृत्व युरोपात नाही. २०१८ सालीच त्यांनी सांगून टाकलं होतं की आत बस झालं, सोळा वर्ष सत्ता उपभोगली, पुरे झालं, आता आपण २०२१ची निवडणुक लढवणार नाही. गंमत पहा….