नोटबंदी, एक महाघोटाळा.अहंमन्यता आणि मूर्खपणातून जन्मलेला.
नोव्हेंबरमधे नोटबंदीला पाच वर्षं पूर्ण झाली. त्या बद्दल ना नरेंद्र मोदींनी भाषण करून स्वतःचं कौतुक केलं, ना सरकारनं ढोल बडवला, ना भाजपनं आपण कशी पाकिस्तानची वा दहशतवाद्यांची जिरवली यावर ट्रोल मोहिम केली. त्यात आश्चर्य वाटण्यासारखं काही नाही. कारण नोटबंदी हे सपशेल अपयश होतं. मीरा सन्याल यांचं पुस्तक तपशील, अभ्यास आणि विश्लेषणातून नोटबंदीनं काहीच साध्य केलं नाही असं सांगतं. THE BIG REVERSE HOW DEMONETIZATION KNCKED INDIA OUT या पुस्तकात मीरा सन्याल तपशीलात जाऊन एकेका मुद्द्यावर नोटबंदी हा कसा गाढवपणा होता ते स्पष्ट करतात. मोदींना काय…