सत्यशील देशपांडे यांची मैफिल
सत्यशील देशपांडे यांनी ग्रंथालीच्या वाचक दिनासाठी जमलेल्या श्रोत्यांपुढं संगितातील सौंदर्यस्थळं सादर केली. मागे एकदा त्यांनी पुलंच्या साहित्यातील संगीत असा विषय मांडला होता. सत्यशील देशपांडे अनेक अंगांनी संगिताला भिडतात, संगिताच्या अनंत पैलूंचा माग काढतात. अनेक नामांकित गायकांचं गाणं त्यांनी ऐकलंय, त्यांच्याशी संगित या विषयावर ते बोललेत आणि कित्येक म्हणजे कित्येक तासांचं संगित त्यांनी साठवून ठेवलं आहे. विषय मांडत असताना ते बोलतात आणि गातात. एक मार्मिक वाक्यं सत्यशील देशपांडे उद्गारले. बॅले हे नृत्य करता येण्यासाठी जिम्नॅस्टिक्स/ॲक्रोबॅटिक्स यावं लागतं, जिम्नॅस्टिक्स/ॲक्रोबॅटिक्स म्हणजे बॅले नव्हे. संगिताची आठ अंगं मानली जातात. ताल,…