युक्रेन. इतिहासाच्या विकृत कल्पनांचा भीषण परिणाम.
पुतीन काल परवापर्यंत भांडं लपवून ताक मागत होते. आता त्यांनी लपवलेलं भांडं पुढं केलं आहे. रशियन ड्यूमामधे (लोकसभा) त्यानी तासभर भाषण केलं आणि युक्रेनवर हल्ला करायची परवानगी मागितली. भाषणात पुतीन म्हणाले की युक्रेन हा रशियाचा सांस्कृतीक, राजकीय, ऐतिहासिक भाग आहे, तो रशियापासून वेगळा केलेला आम्ही सहन करणार नाही, आम्ही युक्रेनवर ताबा मिळवणार. युक्रेन आमचाच आहे आणि तो आम्ही ताब्यात घेणार असं पुतीन यांचं अगदी स्वच्छ म्हणणं होतं. रशियन लोकसभा ही पुतीन यांची खाजगी मालमत्ता आहे. तिथं पुतीन जे बोलतील त्याला होय…