Browsed by
Month: March 2022

मोदी झोपा काढत नाहीत

मोदी झोपा काढत नाहीत

कोल्हापुरच्या चंद्रकांत पाटील यानीच काढलाय हा विषय. चंद्रकांत पाटील म्हणजे भाजपचे आमदार. पाटील म्हणाले की नरेंद्र मोदी दोन तास झोपतात. पाटिलबुवांना कळलंय की मोदींनी चोविस तास झोपेशिवाय रहाण्याचा प्रयोग आरंभलाय. म्हणजे उरली सुरली दोन तासाची झोपही ते भविष्यात कटाप करणार आहेत. हे सारं मोदी कां करत आहेत तर  त्यांना हिंदुंचा देश  स्थापन करायचाय. या आधी दोनच वेळा हिंदूंचा देश होता, महाराणा प्रताप आणि शिवाजी महाराजांच्या काळात. आता पुन्यांदा मोदी हिंदूंचा देश तयार करणार आहेत. त्यासाठी २०२४ निवडणुक त्यांना जिंकायची आहे असंही पाटिलबुवा…

Read More Read More

दांडगाई की सबुरी ? युक्रेनी घडामोडी आणि रशिया चीन संबंध.

दांडगाई की सबुरी ? युक्रेनी घडामोडी आणि रशिया चीन संबंध.

युक्रेन प्रकरणात चीन किती गुंतलंय? चीन आणि रशियाचे संबंध कसे आहेत? किती घनिष्ट आहेत? दोघांमधलं सहकार्य कोणत्या प्रकारचं असेल आणि किती टोकाचं असेल? असे प्रश्न रशियाच्या युक्रेन आक्रमणाला तीन आठवडे होत असताना चर्चेमधे आले आहेत.   युक्रेन आक्रमण सुरु होण्याच्या आधी तीन आठवडे पुतीन आणि सी जिनपिंग यांची प्रत्यक्ष भेट झाली होती. हिवाळी ऑलिंपिकला भेट देण्याचं निमित्त पुतीन यांनी साधलं होतं. तेव्हां पुतीन यांनी युक्रेनच्या हद्दीवर सैन्य नेऊन ठेवलं होतं आणि युक्रेनवर कारवाई करणार आहोत असं सांगायला सुरवात केली होती. त्या…

Read More Read More

पाशवी शक्तीसमोर युक्रेन अजून टिकून आहे

पाशवी शक्तीसमोर युक्रेन अजून टिकून आहे

 काय होणार युक्रेनचं? आज रशियाची युक्रेनस्वारी १४ दिवस झालेत. युद्ध संपण्याची चिन्हं दिसत नाहीयेत. २४ फेब्रुवारीला रशियाच्या दबा धरून बसलेल्या फौजा युक्रेनमधे घुसल्या. नेमक्या किती ते सांगता येत नाही. कारण पुतीन हा एक नंबरचा फेकू माणूस आहे. खोट्या बातम्या पसरवणं, अपप्रचार करणं, कुभांड रचणं ही केजीबीत असताना अंगी बाणवलेली कला पुतीन वापरत आहेत.  दीड लाख म्हणतात  या दीड लाखात सुमारे ७० हजार आहेत राखीव जवान, म्हणजे सक्तीनं भरती केलेले तरूण. त्यांना युद्धाचा काहीही अनुभव नाही. काही आठवड्यांच्या जुजबी प्रशिक्षणानंतर त्यांना गणवेष घालून…

Read More Read More

युक्रेनमधे अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांचं काय होणार ?

युक्रेनमधे अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांचं काय होणार ?

भारतीय विद्यार्थी वीस पंचवीस किमी अंतर बर्फ तुडवत युक्रेनमधून पोलंडच्या सरहद्दीवर गेले. त्यांना भारतात परतायचं होतं. भारत सरकारनं त्यांना सल्ला दिला होता की त्यानी कसंही करून पोलिश हद्दीपर्यंत पोचावं, तिथून त्यांना भारतात आणायची सोय केली जाईल. विद्यार्थी हद्दीपर्यंत पोचले. तिथं हद्दीवरचा चेक नाका होता. युक्रेनच्या अधिकाऱ्यांनी त्यांना अडवलं. सांगितलं की आम्ही प्रथम आमच्या नागरिकांना जाऊ देतो, नंतरच तुमचा नंबर लागेल. ढकला ढकली होत होत कसा तरी नंबर लागला. एका  भारतीय विद्यार्थ्यानं त्याच्या सोबत असलेल्या दुसऱ्या भारतीय विद्यार्थ्याची कहाणी सांगितली. म्हणाला की…

Read More Read More