मॅक्रॉन पुन्हा अध्यक्ष होण्याचा अर्थ
इमॅन्युअल मॅक्रॉन दुसऱ्यांदा फ्रान्सचे अध्यक्ष झालेत. सामान्यतः फ्रेच माणसं अध्यक्षाला दुसरी टर्म देत नाहीत, फुटवतात. फ्रेंच माणसांना सतत बदल हवा असतो. त्यांच्या अध्यक्षांकडून भरमसाठ अपेक्षा असतात, त्या कधीच पूर्ण होत नाहीत, लोकं त्यांना हाकलतात. मॅक्रॉन कसे काय टिकले? मॅक्रॉन मुळातच अध्यक्ष झाले ते मध्यममार्गी म्हणून. फ्रान्समधे अती डावे आणि अती उजवे असे पक्ष होते. लोकमतंही विभागलेलं होतं. डावे, उजवे, मध्यम मार्गी अशा विचारांची माणसं प्रत्येकी सुमारे वीस ते तेवीस टक्के होती. डाव्या लोकांनी ठरवलं की उजवे लोकं डेंजरस आहेत, तेव्हां…