क्वाड बैठक. भारतासमोरचा पेच. गटात की स्वतंत्र.
क्वाड या अनौपचारीक गटाची बैठक जपानमधे पार पडली. अमेरिका, जपान, ऑस्ट्रेलिया आणि भारत या चार सदस्य देशांचे प्रमुख बैठकीत हजर होते. बैठकीत औपचारीक ठराव मंजूर झाले, देशांच्या प्रमुखांच्या खाजगी बैठका झाल्या, बैठकांचे औपचारिक वृत्तांत प्रसिद्ध झाले. एकमेका सहाय्य करू (आर्थिक, तंत्रवैज्ञानिक, पर्यावरण हे मुद्दे) असं चारही देश बोलले. खरा मुद्दा होता तो चीनला वेसण घालण्याचा. खरं म्हणजे चीनवर अंकुष ठेवण्यासाठीच हा गट स्थापन झाला आहे. चीन आशियात हातपाय पसरतो आहे. भारत आणि लंका या चीनच्या बाजारपेठा आहेत, तिथं चीनची खूप गुंतवणूक आहे. ऑस्ट्रेलियातून…