प्रतिक हा फक्त देखावा, ती वापरणाऱ्यांचा अंतस्थ हेतू वेगळाच असतो.
एकनाथ शिंदे शिव सेनेतून बाहेर पडले. काल परवापर्यंत ते शिव सेनेतले नेते-कार्यकर्ते होते. त्यांनी सेनेत विविध पदांवर काम केलं, नंतर ते मंत्रीही झाले. बाहेर पडल्यावर त्यांचं काय होईल? त्यांची संघटना कोणती असेल? शिव सेना की भारतीय जनता पार्टी? लवकरच कळेल. बाहेर पडल्यावर ते कुठल्या तरी पार्टीसाठी, चिन्हावर निवडणुक लढवतील. निवडून आले तर मंत्री होतील. शिंदे यांचं म्हणणं आहे की ते सेना, बाळ ठाकरे, शिवाजी महाराज आणि हिंदुत्व यांच्याशी प्रामाणीक आहेत, तीच त्यांची प्रतिकं आणि आदर्श आजही असतील. त्यांचं म्हणणं असं…