ब्राझील ” राष्ट्रपती भवनात एक खुनी लपलाय. ”
ब्राझीलची न्याय व्यवस्था आणि सेनेट यांच्यात आता संघर्ष उद्भवला आहे. सेनेटनं स्वतंत्र चौकशी करून प्रेसिडेंट बोल्सोनारो यांच्यावर कोविड हाताळणी संदर्भात खटला भरावा अशी मागणी केली. ब्राझीलच्या प्रॉसिक्युटरनं सेनेटची मागणी धुडकावली, सेनेटनं केलेले महत्वाचे आरोप फेटाळून लावलेत. सेनेटला आता प्रॉसिक्यूटरवरच खटला भरून त्यांची हकालपट्टी करायची मोहीम चालवावी लागणार असं दिसतंय. ब्राझीलमधे सात लाखापेक्षा जास्त माणसं कोविडनं मेली, कोविडचा प्रकोप अजूनही थांबायला तयार नाही. बोल्सोनारोना हर्ड इम्युनिटी यायला हवी होती. म्हणजे असं की कोविडची लागण सर्व जनतेला होईल. सर्वानाच लागण झाल्यानतर प्रसाराचा संबंधच…