Browsed by
Month: August 2022

पुतीनना धोक्याचा इशारा

पुतीनना धोक्याचा इशारा

पुतीनना झटका दारिया दुगिना (२९) एका उत्सवातून परतत असताना क्रेमलिनमधे त्यांच्या  कारमधे स्फोट झाला. त्या जागच्या जागी चिंधड्या होऊन मेल्या. स्फोट येवढा मोठा होता की रस्त्याच्या दुतरफा असलेल्या इमारती हादरल्या, खिडक्यांची तावदानं फुटली. अंदाज असा आहे की त्यांचे वडील अलेक्झांडर दुगिन हे स्फोट करणाऱ्यांचं लक्ष्य होते. उत्सवाला वडील व मुलगी दोघी एकत्र हजर होत्या आणि अलेक्झांडर यांच्याच कारनं दोघं परतणार होते. काही कारणानं अलेक्झांडर उत्सवाच्या ठिकाणी थांबले आणि त्यांच्याच कारमधल्या दारिया बळी पडल्या. अलेक्झांडर आणि दारिया, दोघंही पुतीन यांचे कट्टर समर्थक…

Read More Read More

आपण कुठे आहोत?

आपण कुठे आहोत?

भारताला ब्रिटीश सत्तेपासून राजकीय स्वातंत्र्य मिळाल्याला आता ७५ वर्षं होत आहेत.   लोकांना विचार देश कसा आहे बुवा? लोक म्हणणार महान आहे. म्हणजे कसा आहे? असं म्हटलं की लोक बावचळतात. कारण महानता कशी ठरवायची ते त्याला कळत नाही. उदा. जिथं सार्वजनिक आरोग्य चांगलं असतं ते देश बाहेरूनच चांगले दिसतात, सांगावं लागत नाही. माणसं रस्त्यावर, उघड्यावर संडास करत असतील तर लगेच त्यावरून त्या समाजाचा दर्जा लगेच लक्षात येतो, सांगावं लागत नाही.  पंतप्रधानांनी जर्मनीत जमलेल्या भारतीयांना सांगितलं की आता भारतात प्रत्येकाच्या धरी संडास…

Read More Read More

देशप्रमुख गुन्हेगार असला तरी त्याच्याशी जुळवून घ्यावं लागतं.

देशप्रमुख गुन्हेगार असला तरी त्याच्याशी जुळवून घ्यावं लागतं.

१५ जुलै २०२२ ला अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन सौदी अरेबियात गेले. तिथं त्यांनी सौदी अरेबियाचे राजपुत्र बिन सलमान यांच्याशी वाटाघाटी केल्या. बिन सलमान राजपुत्र असले तरी खरं म्हणजे राजेच आहेत, तेच सगळा कारभार हाकत असतात. वडील जिवंत आहेत म्हणूनच ते राजपुत्र आहेत येवढंच.   बायडन यानी आपल्या निवडणुक प्रचार मोहिमेत बिन सलमान यांना बहिष्कृत करू असं म्हटलं होतं. ज्याला बहिष्कृत करायचं म्हणत होते त्याच्याशी हात मिळवणी? हात मिळवणी नाही म्हणता येणार. हात एकमेकाच्या हातात घेण्याऐवजी मुठी एकमेकावर आदळल्या, मूठभेट घेतली. तांत्रीकदृष्ट्या बायडन…

Read More Read More

बुचर ऑफ दिल्ली

बुचर ऑफ दिल्ली

नेटफ्लिक्सवर तीन भागात दिल्लीतल्या बिहारी खुन्याची कथा ‘ बुचर ऑफ दिल्ली ‘  प्रदर्शीत झालीय.   या एका घडलेल्या कथानकावर वेब सीरियल आधारलेली आहे. डॉक्युमेंटरी आहे, अभिनेते घेऊन डॉक्युमेंटरी तयार केलीय.  गोष्ट चंद्रकांत झा नावाच्या एका खुन्याची आहे. त्यानं किती खून केलेत त्याची गणती नाही पण तीन खुनांच्या बाबतीत पोलिसांना काही पुरावे सापडले. त्या आधारावर त्याला जन्मठेपेची शिक्षा झालीय, तो दिल्लीच्या तिहाड तुरुंगात आहे.  चित्रपटाच्या रूपात गोष्ट सांगितलेली आहे. डॉक्युमेंटरीत  तपास करणारे पोलिस अधिकारी, पत्रकार, चंद्रकांत झा याचे समकालीन, बळी पडलेल्या व्यक्तींचे नातेवाईक, घोषई…

Read More Read More