पिकलेलं पान गळलं
युकेच्या राणी दुसऱ्या एलिझाबेथ यांचं वयाच्या ९६ व्या वर्षी निधन झालं. दुसऱ्या महायुद्धानंतर सारं जग बदललं. साम्राज्य कोसळली. जगात मुक्तअर्थव्यवस्था विकसली. शहरं वाढली. संस्कृतीला उद्योगानी विळखा घातला. अशा नव्या जगाच्या पहाटे १९५२ साली एलिझाबेथ एका विरघळत जाणाऱ्या साम्राज्याच्या अवशेषाच्या राणी झाल्या. राणी बऱ्याच आजारी आहेत याचा सुगावा ७ सप्टेंबर रोजी लागला. तिथून राणी हा विषय माध्यमात आला. १९ सप्टेंबर रोजी त्यांची शवपेटी तळघरात सुरक्षित ठेवली गेली तोपर्यंत म्हणजे जवळपास १२ दिवस जगभरच्या माध्यमांत राणी हा विषय होता. बीबीसीनं जवळजवळ चोविस तास…